वेंगुर्ले
मातोश्री सेवधाम ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी सुरू असलेल्या कार्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी कौतुक केले आहे. येथे सुरू असलेल्या आरोग्य तपासणी दरम्यान निलेश राणे यांनी भेट देऊन त्याठिकाणी यापुढे संस्थेच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबविता येतील याबाबत चर्चा केली.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे याठिकाणी आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी मातोश्री सेवधाम ट्रस्ट, सिंधुदुर्गच्या वतीने गेले ६ दिवस चिपळूण येथील अनेक भागात आरोग्य शिबीर, जंतुनाशक फवारणी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपही कारण्यात आले.
दरम्यान चिपळूण येथील कुंभारवाडी येथे सुमारे २०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी माजी खासदार निलेश येणे यांनी याठिकाणी भेट देत ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करून पुढील उपक्रमाबाबत चर्चा केली. त्यावेळी ट्रस्ट चे डॉ मनोज चव्हाण, अमित बने, संदीप परब व इतर सदस्य उपस्थित होते.