वेंगुर्ला
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या मार्फत तसेच मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेंतर्गत जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्गतर्फे वेंगुर्ला तालुक्यातील सात हायस्कूलमधील ६० विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आल्या.
अणसूर-पाल हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परिवर्तन केंद्राचे समन्वयक विलास हडकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जेष्ठ नेते बाळा सावंत, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर केळजी, माजी मुख्याध्यापक एम.जी.मातोंडकर, अणसूर-पाल मुख्याध्यापिका शैलजा वेटे, आडेली हायस्कूलचे सुनील जाधव, केळुस हायस्कूलचे भालचंद्र थवी, रेडी हायस्कूलचे चंद्रशेखर जाधव, मातोंड हायस्कूलचे सतीश चांदणे, तुळस हायस्कूलच्या आश्विनी नाईक, शिरोडा हायस्कूलचे राजू चव्हाण यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
गरिब विद्यार्थिनींना हायस्कूलमध्ये येताना होणारा त्रास कमी करण्यासाठी सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून ‘सायकल बँक‘ ही संकल्पना संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याचे विलास हडकर सांगितले.