आज बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कुडाळ मधील कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी शर्वाणी रमाकांत कुलकर्णी हिने ६०० पैकी ५९४ गुण (९९%) मिळवून कुडाळ येथील प्रशालेच्या सर्व शाखांत सर्व प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून वाणिज्य शाखेत २०८ पैकी २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेची विद्यार्थिनी मृणाल सुधाकर ठाकूर हिला ९७.५०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर मृण्मयी रवींद्र वालावलकर हिने ९६.६६% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
विज्ञान शाखेत १६० पैकी १६० उत्तीर्ण होऊन प्रथम जांभळे भूपेंद्र बळीराम ९६.६६%, द्वितीय धैर्य अतुल बागवे ९४.८३%, तृतीय गायत्री संतोष झुल्फे ९०.६६% या प्रमाणे यशस्वी ठरले.
कला शाखेत १४० पैकी १४० उत्तीर्ण होऊन प्रथम – हर्षदा माधव प्रभूदेसाई ८७.६६ %, द्वितीय – स्वराली संदीप साळसकर ८५.३३ %, तृतीय – रामचंद्र गणपत सावंत ८२.८३% मिळवलेत.
व्होकेशनल शाखेत ५० पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रुचिरा राजेश म्हसकर व प्रज्ञा त्रिविक्रम भाटवडेकर यांनी ९०.६६% गुण मिळवत संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय सिद्धी संजय डेगवेकर ८४.५०% तर तृतीय करिश्मा राजाराम मार्गी लागतील ८३.८३% मिळवून यशस्वी ठरले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्यकारी संचालक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी अभिनंदन केले.