You are currently viewing रजनी लाजरी

रजनी लाजरी

निळ्या आकाशी शीतल मुखडा
हा चंद्रमचा
चम चम चांदण्या हासत करिती
सडा सुवर्णाचा
सजून उभी हि मुग्ध बावरी
सखी चंद्रमाची
मुखावर या तिच्या शोधितो
लाली लज्जेची
गडप चंद्रमा नभात झाला
बावरली सुंदरा
दूर करुनि नभ हे सारे
न्याहाळितो तिजला
असे संपले क्षण हे सारे
नेत्र पल्लवीचे
पूर्व दिशेहूनि कुणी पहातो
क्रोधपूर्ण भासे
पहाट होता जागी झाली
हि सृष्टी सारी
दूर सरली रजनी लाजरी
एकांत भंग होता

– हेमंत रेडकर
दाभोली, ता. वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग.
मोबाईल नंबर – ९४२३८११२३९.

प्रतिक्रिया व्यक्त करा