You are currently viewing तुझ्या प्रीतीचा रंग गुलाबी

तुझ्या प्रीतीचा रंग गुलाबी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम ओळ काव्यलेखन*

 

*तुझ्या प्रीतीचा रंग गुलाबी*

 

*प्रीत तुझी*

 

तुझ्या रे प्रीतीचा।

रंग तो गुलाबी।

दिसते शराबी।

दृष्टी तुझी।।

 

ओढ लावलीस।

काळजास माझ्या।

जाण ती तुझ्या।

मनातून।।

 

हरपली भूक।

विसरली तृष्णा।

विरहाच्या खुणा।

तप्त देही।।

 

गजरा माळून।

वाट मी बघते।

डोळ्यात दाटते।

आता पाणी।।

 

तुझ्या मिठीमधे

हळूच शिरावे

अधरी टेकावे

ओष्ठद्वय।।

 

सांज गर्द होते

आता तरी येना

भिजल्या नेत्रांना

टिप तूच।।

 

भेट ती गुलाबी।

होऊ दे गहिरी।

कोर ही लाजरी

मेघाआड…..।।

 

००००००००००००००🌹🌿

*अरुणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + twenty =