You are currently viewing राजन तेली व त्यांचे सहकारीच कळणे मायनींगचे जन्मदाते -परशुराम उपरकर

राजन तेली व त्यांचे सहकारीच कळणे मायनींगचे जन्मदाते -परशुराम उपरकर

गाडगीळ समिती ला विरोध करणारे जनतेचा विकास काय करणार

दोडामार्ग

कळणे मायनिंगची चिखल माती लोकांच्या घरादारात गेल्यानंतर हरित लवादाकडे जाण्याची भाषा करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कळणे मायनिंगचे जन्मदाते कोण? याचे आत्मचिंतन करावे असे आवाहन मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे

कळणे मायनिंगला विरोध होत असताना जनसुनावणीत धिंगाणा घालणारे कोण होते हे जनतेला माहिती आहे असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस उपरकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार ,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किंनळेकर, राजेश टंकसाळी, दया मेस्त्री, महेश सावंत, लक्ष्मीकांत हरमलकर, मंगेश वरक ऋग्वेद सावंत, संतोष सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. उपरकर म्हणाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कळणे मायनिंग प्रश्नी हरित लवादाकडे जाण्याच्या इशारा दिला आहे मात्र कळणे मायनिंगचे जन्मदाते कोण याचे त्यांनी आत्मचिंतन करावे. कळणे मायनिंगच्या पाटील, ठाकूर यांच्याशी संधान कोणाचे होते. मी आमदार असताना विधानसभेत आणि सभागृहाबाहेर वेळोवेळी कळणे मायनिंग प्रश्नावर आवाज उठवला आहे कळणे गावाने भरपूर सोसले आहे. खूनाची केसही दाखल झाली. जनेतला फसवले गेले लोकांचा विरोध असताना सत्ताधाऱ्यांनी मायनिंगला सहकार्य केले

श्री. उपरकर म्हणाले, गाडगीळ समितीला विरोध करणारे जनतेचा विकास रोखणारे आहेत म्हणून आम्ही सांगत होतो. गाडगीळ समितीची जनजागृती केली त्यावेळी राज्यकर्त्यांनी ग्रामपंचायती ठराव घेऊन जनतेची दिशाभूल केली या भागात तीन ठिकाणी भुलख्खन झाले आहे, हे मानवनिर्मित असल्याचे यावरून सरळ उघड झाले आहे मायंनिग वाहतुकीमुळे अनेकांचे जीव गेले आहेत हवा पाणी प्रदूषित झाली आहे त्यामुळे कळणे मायनिंग च्या जनसुनावणी यावेळी धिंगाणा घालणारे आणि मायनिंगला समर्थन करणारे कोण होते हे जनतेला माहिती आहे.

याठिकाणी मायनिंग झाले नसते तर आज घडलेला प्रकार घडला नसता. या मायनिंग प्रकल्पा सोबत इन्सुली, निगुडे,वेत्ये, सोनुर्ली भागात असणारे काळा दगड खाणीचे प्रकल्प देखील भयंकर आहेत एका भूपृष्ठावर किती दगडखाणी असाव्यात हे ठरवून दिलेले आहे या पट्ट्यातील तिराळी प्रकल्पाच्या कालव्याला देखील धोका आहे कालव्या लगतच खाणी आहेत खनिज युक्त माती आणि दगड खाणी यावर सरकारचे नियंत्रण नाही खरे तर खनिज आणि काळा दगड खाणे यांचे सहा मीटर पर्यंत खोल करण्याची परवानगी आहे मात्र या खाणी २००ते २५० मीटर आग मध्ये खड्डे खोदलेले आहे त्यामुळे हवा पाणी नदी पात्रे प्रदूषित झाली आहे, असे ते म्हणाले.

खऱ्या अर्थाने याला शासन कर्ते जबाबदार आहेत शासन कररूपाने गोळा करत असले तरी गाळ काढण्यासाठी तो पुन्हा खर्च होणार आहे म्हणजे शासनाच्या तिजोरीत ठणठणाट आहे.माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि मी गाडगीळ समितीला भेटलो त्यावेळी स्थानिक आमदार केसरकर यांनी मायनिंगला समर्थन तर कुडाळच्या आमदारांनी गाडगीळ अहवाल जाळून टाकला असे परशुराम उपरकर म्हणाले.

वृक्षतोडीकडे वन अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असून आर्थिक देवाण-घेवाण मुळे कोकण नैसर्गिक दृष्ट्या बोडका होत असून कोकण पण नष्ट करण्याचे काम करत आहेत कळणे मायनिंग प्रश्नी मायनिंग सेफ्टी यंत्रणेला पत्र दिले जाईल मायनिंग सेफ्टी दिल्ली कार्यालयात पत्रव्यवहार केला जाईल पणजी कार्यालयावर आमचा विश्वास नाही आणि त्यानंतर पुढील भूमिका घेतली जाईल, असे ते म्हणाले.

गांजा सारख्या प्रकाराने सावंतवाडीला बदनाम केले आहे सावंतवाडीत एका वस्तीततील लोक अडकले आहेत गांजाला आमचा कायमच विरोध असून पोलिस महासंचालकांकडे आम्ही गांजा, अंमली पदार्थ, दारू विरोधात तक्रार करणार आहोत सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, सातारा भागात दारू जाते आणि तिथे सापडते मग तपासणी नाकी काय करतात असा प्रश्न देखील परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा