You are currently viewing ४९ हजार कोटीची रक्कम बँका विमा कंपन्यांकडे विना दाव्याची पडून

४९ हजार कोटीची रक्कम बँका विमा कंपन्यांकडे विना दाव्याची पडून

 

देशातील बँका आणि विमा कंपन्यांकडे जवळपास ४९ हजार कोटी रुपये विना दाव्याचे पडून आहेत, अशी माहिती मंगळवारी वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेमध्ये दिली आहे. हा आकडा ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या असल्याचेही सांगितले आहे. भारतीय रिझर्व बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बँकांची ८.१ कोटी खात्यांमध्ये विना दाव्याची २४,३५६ कोटी रुपयांची रक्कम पडून राहिलेली आहे. म्हणजे प्रत्येक खात्यामध्ये साधारण ३ हजार पडून राहिले असून त्याचा क्लेम केला नसल्याचे नमूद केले आहे .

सरकारने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय बँकांमध्ये ५.५ कोटी खात्यांमध्ये १६,५९७ कोटी रुपये आहे. साधारण ३०३० कोटी रुपये विनाकारण पडून राहिलेले आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँकेत साधारण १.३ कोटी खात्यांमध्ये एकूण ३,५७८ कोटी रुपये पडून आहेत. खासगी बँकांमधील खात्यांमध्ये ३,३४० कोटी रुपये पडून आहेत. नियमांच्या आधारे बँका जवळ विना दाव्याचे पैसे हे डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेयरनशस फंड योजनेमधील खात्यांमध्ये घातले जातात. केंद्रीय बँकेने ही योजना २०१४ रोजी लॉंच केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − 1 =