सावंतवाडी :
कोकणातील कोकम सोलाना महाराष्ट्र तसे परदेशात मोठे महत्त्व आहे. कोकण सोल तर ‘आमसूल’ या नावाने प्रसिद्ध आहे, मात्र यंदा झालेल्या तोक्ते वादळामुळे फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कोकम सोल तसेच कोकम सरबत ,आगळ आधी कोकण उत्पादनाचे भाव वधारले आहे. जिल्ह्यात 90 टक्के उत्पादन नैसर्गिक रित्या होते सर्व साधारणपणे एप्रिल महिन्यापासून कोकमाची फळे पक्व होऊ लागतात मे महिन्याच्या शेवटी कोकम फळे पिकण्याच्या बहार असतो. या कोकम फळापासून कोकम सोल ,सरबत, आगळ आदी उत्पादने येथील शेतकरी घरोघरी बनवता मात्र यावर्षी मे महिन्याच्या मध्यावर झालेल्या वादळामुळे कोकमची कच्ची फळे जमिनीवर पडून वाया गेली तर झाडावर शिल्लक राहिलेली फळे तसेच सततच्या पावसामुळे कुजून गेली. या सर्व प्रक्रियेसाठी पुरेसा प्रमाणात कोकम मिळाला नाही त्यामुळे यावर्षी कोकम सोल सरबत आगळा चे उत्पादन घटले आहे. सहाजिकच उत्पादनाचे भाव या वर्षी चांगले वधारले आहेत.