You are currently viewing शेर्ले- निगुडे रस्त्यावरील मोरीला भगदाड…

शेर्ले- निगुडे रस्त्यावरील मोरीला भगदाड…

बांदा

शेर्ले-निगुडे रस्त्यावर शेर्ले येथे मोरीवरील पुलावर भगदाड पडल्याने पूल वाहतुकीस धोकादायक बनले आहे. याबाबतची माहिती शेर्ले सरपंच उदय धुरी यांनी बांधकाम विभागाला दिली आहे.
शेर्ले-निगुडे रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. आज सकाळी रस्त्यावरील मोरीच्या पुलावर अचानक भलेमोठे भगदाड पडले. रात्रीच्या वेळी प्रवास करताना याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतची माहिती सरपंच धुरी यांना मिळताच तात्काळ त्यांनी याठिकाणी जात पाहणी केली. अपघात टाळण्यासाठी याठिकाणी अडथळा निर्माण केला आहे. धुरी यांनी याची कल्पना बांधकाम विभागाला दिली असून लवकरात लवकर भगदाड बुजवावे अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा