रस्त्यावर, शेतीत चिखलाचे साम्राज्य
कळणे-तळकट मार्ग बंद, दोन्ही बाजूने गर्दी…
दोडामार्ग
कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील भाग खाणीत कोसळला आहे.परिणामी खाणीतील पाणी व चिखली युक्त माती परिसरातील शेती, लोकवस्तीत येत आहे. रस्त्यावर चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प आहे. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.