You are currently viewing दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर भाजपात दाखल

दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर भाजपात दाखल

दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर भाजपात दाखल

कणकवलीत ठाकरे सेनेला हादरा;
आम. नितेश राणे यांनी केले स्वागत

कणकवली

विकासकामे व गावचा विकास हा आम. नितेश राणे आणि भाजपा पक्ष यांच्याच माध्यमातून होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दिगवळेचे ठाकरे सेनेचे सरपंच संतोष रामचंद्र घाडीगावकर यांनी आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपा पक्षात प्रवेश केला.

यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत माजी जि.प. अध्यक्ष, संजना संदेश सावंत माजी जि. प. अध्यक्ष, राजेश पवार ग्राम. सदस्य, अनुजा पवार ग्राम. सदस्य, रेश्मा खांडेकर ग्राम. सदस्य, मनिषा केरे ग्राम.सदस्य, संजना चव्हाण, हरिश्चंद्र परब, महेश पवार, गणेश कुबल, सतीश सावंत, संदीप चव्हाण, बाबू घाडी उपस्थित होते.

दरम्यान प्रवेशानंतर आपण गावतील विविध विकास कामे व गावच्या विकासाला चालना देणारी काम करणार असल्याचे सरपंच संतोष रामचंद्र घाडीगावकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा