You are currently viewing मालवण राष्ट्रीय कॉंग्रेसचे बांगीवाडा समाजमंदिर समोर आंदोलन

मालवण राष्ट्रीय कॉंग्रेसचे बांगीवाडा समाजमंदिर समोर आंदोलन

केंद्राच्या अघोषित आणीबाणी विरोधात दिल्या घोषणा

मालवण

केंद्र सरकारने अघोषित आणीबाणी केल्याचा आरोप करत त्या विरोधात आज मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधित मालवण बांगीवाडा येथील समाजमंदिरासमोर काळ्या फिती लावून व काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकारने देशात अघोषित आणीबाणी सारखा कारभार चालविला आहे. सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्याना तसेच सत्य मांडणाऱ्या माध्यमांना सरकार देशद्रोही ठरवत आहे, त्यांना तुरुंगात डांबत आहे, याचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष निषेध करत असून सरकार विरोधात आवाज उठविण्यासाठीच हे आंदोलन केले आहे, असे यावेळी मेघनाद धुरी यांनी सांगितले.

या आंदोलनाच्या प्रारंभी बांगीवाडा येथील समाजमंदिरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या अघोषित आणीबाणीच्या विरोधात काळ्या फिती लावून व काळे झेंडे दाखवले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेमधील लोकशाही मूल्याचे प्राणपणाने रक्षण करेन व अघोषित आणीबाणीला विरोध करीन अशी शपथ यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, आप्पा चव्हाण, संदेश कोयंडे, हेमंत तळवडेकर, संजय धुरी, सदा चुरी, हेमंत कांदळकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − five =