*सरचिटणीस महेंद्र सावंत ना. अशोक चव्हाण यांची घेणार भेट*
कणकवली :
कार्यकारी अभियंता,सा.बा.विभाग कणकवली यांना महिंद्र सावंत, सरचिटणीस सिंधुदुर्ग, यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मल्हारी पुल नवीन बांधण्यासाठी निवेदन देण्यात आले.
कणकवली तालुक्यातलं नाटल येथील मल्हारी पुल अतिवृष्टीमुळे कोसळून गेला आहे,त्यामुळे परिसरातील ५ ते ६ गावांचा संपर्क तुटला आहे.त्यामुळे नवीन पुल बांधणीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले.यावेळी नातल गावचे सुपुत्र व माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्याशी संपर्क साधून हे काम आपत्कालीन व्यवस्थापनातून सां.बा.विभागातर्फे त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली.
१५ ऑगस्टपर्यंत आराखडा होऊन नंतर ऑक्टबरपर्यंत टेंडर प्रक्रिया करून मार्चअखेर पुलाचे काम पूर्ण होईल. त्यासाठी पुढच्या आठवड्यात अशोकराव चव्हाण भेटून पाठपुरावा करू असे महिंद्र सावंत यांनी सांगितले.यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, तलगवकर,प्रवीण वरूनकर, महेश तेली,निलेश मालंडकर , लोरेंस डिसोझा आदी उपस्थित होते.