2017 पासून विकास निधी चुकीच्या पद्धतीने वितरित होत असल्याचा आरोप
देवगड
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाकडून जिल्हा परिषद अधिनियम आणि शासन धोरणाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे पोंभुर्ले जिल्हा परिषद मतदारसंघ सदस्य प्रदीप नारकर यांनी केला आहे
त्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनासह आयुक्तांचे ही मागील चार वर्षात अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले जिल्हा परिषद च्या मासिक व सर्वसाधारण सभेत ही विचारणा करण्यात आली मात्र चौकशी सुरु असल्याचे सांगून चालढकल केली जात आहे या कारभाराविरोधात आता २ ऑगस्ट पासून ठिय्या आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी दिला आहे,
2017 पासून विकास निधी चुकीच्या पद्धतीने वाटण्यात आला आहे आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले मात्र प्रशासनाने चौकशीच्या नावाखाली अद्याप कोणतीच कार्यवाही केले नसल्याचा आरोप नारकर यांनी केला आहे
ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या 0. 50 टक्के निधी बाबतची माहिती अनेक वेळा मागणी करून देखील देण्यात आली नाही
देवगड पंचायत समिती शिक्षण विभागातील करोडो रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या अलमवार यांच्यावर फौजदारी दाखल करावी
देवगड विठ्ठलादेवी काडगेवाडी सौर विद्युत दुहेरी पंप योजना पैसे खर्च पडूनही चार वर्षापासून अपूर्णावस्थेत आहे
कारवाई केली जाईल असे सांगितले मात्र कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे
निर्लेखित झालेली नाद शाळा इमारत कोसळल्याने ही जागा ग्रामपंचायत इमारतीसाठी देण्यात यावी देवगड तालुक्यातील काही गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रतिबंधात्मक बंधाऱ्या बाबत 2018/18 या कालावधीत तक्रार करण्यात आली होती यामध्ये तथ्य असलेल्या चौकशी अधिकारी यांच्या अहवालानुसार समोर आले आहे मात्र चार वर्षे होऊनही कारवाई झालेली नाही असे त्यांनी म्हटले आहे
जिल्हा परिषद प्रशासनाच्या या वेळ काढू धोरणाबाबत नकारात्मक तोडगा निघत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले असल्याची माहिती प्रदीप नारकर यांनी प्रसिद्ध केली.