You are currently viewing पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट रोजी

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट रोजी

सिंधुदुर्गनगरी

इयत्ता 5वी ची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8 वी ची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार  असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे कळविले आहे.

        प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी ही 23 मे 2021 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यातमध्ये  एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत 30 मार्च 2021 च्या प्रसिध्दीप्रत्रकान्वये जाहिर करण्यात आले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यातमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन परीक्षा तुर्त पुढे ढकलण्यात आली होती.

           दिनांक 10 मे 2021 च्या प्रसिध्दीपत्रकामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी ही दिनांक 8 ऑगस्ट रोजी मान्यता देण्यात आली आहे.  परंतु दिनांक 8 ऑगस्ट रोजी काही जिल्ह्यात केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी दिनांक 8 ऑगस्ट 2021 ऐवजी 9 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा अध्यक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक 27 जुलै 2021 रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक 27 जुलै 2021 राजी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी  व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी याची नोंद घ्यावी असे, आवाहन आंबोकर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद  यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा