सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 13.3 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2688.18 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 25(2606), सावंतवाडी – 16(2883.10), वेंगुर्ला – 13.4(2218.4), कुडाळ – 09(2543), मालवण – 10(2910), कणकवली – 15(2934), देवगड – 05 (2383), वैभववाडी – 13(3028), असा पाऊस झाला आहे.