You are currently viewing मालवण कोविड सेंटर येथील डॉक्टर व कर्मचारी यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मान

मालवण कोविड सेंटर येथील डॉक्टर व कर्मचारी यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मान

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

मालवण ग्रामीण रुग्णालय येथील ऑक्सिजन बेड कोविड सेंटर येथे उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना विशेष सन्मानपत्र देऊन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

आ.वैभव नाईक व शिवसेना मालवणच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम मालवण ग्रामीण रुग्णालय येथे संपन्न झाला.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बालाजी पाटील यांच्यासह वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता. तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, आरोग्य सभापती दर्शना कासवकर, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, नगरसेविका सेजल परब, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर, शीला गिरकर, अंजना सामंत, नंदा सारंग, दीपा शिंदे, युवासेना शहरप्रमुख तपस्वी मयेकर, संमेश परब, भाई कासवकर, बाळू नाटेकर, प्रसाद आडवणकर आदी व अन्य उपस्थित होते.

यावेळी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, मंदार केणी यांनी डॉक्टर व कर्मचारी वर्गाने कोरोना काळात दिवसरात्र केलेल्या रुग्णसेवेचे विशेष कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =