केंद्र आणि राज्य सरकारची मदत मिळवून देण्यासाठी करणार पाठपुरावा
चिपळूण प्रमाणेच बांदा बाजारपेठेत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
कणकवली
चिपळूण बाजारपेठे प्रमाणेच बांदा बाजारपेठेत सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. त्यां कुटुंबानाही परत उभे करण्याची गरज आहे. बांदा बाजारपेठेत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून योग्यती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा बाजारपेठ घुसलेले पाणी आणि झालेल्या नुकसानीची आमदार नितेश राणे यांनी माहिती घेतली आहे. त्यांनतर ही बाजरापेठ पूर्वरत उभी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे आणि ती मदत मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे आम.नितेश राणे यांनी सांगितले.