You are currently viewing सिन्धुदुर्गात प्रथमच भव्य सरळ संस्कृत परीक्षेचे आयोजन

सिन्धुदुर्गात प्रथमच भव्य सरळ संस्कृत परीक्षेचे आयोजन

संस्कृत बालबोध वर्गाचा शुभारम्भ व्याकरणाचार्य संस्कृत विभूषण हरिश्चंद्रजी यांच्या मार्गदर्शनाने झाला

भारतीय विद्या भवन-मुंबईद्वारे मान्यता प्राप्त सरळ संस्कृत परीक्षा केंद्र सिन्धुदुर्ग सावंतवाडी- बालबोध परीक्षेचे प्रथमच भव्य आयोजन केले आहे.
रविवार दिनांक २५ जुलै २०२१ रोजी सदर बालबोध वर्गाची सुरवात झाली.
या परिक्षेसाठी कोणतीही वयोमर्यादा नसून संस्कृत भाषा लोकाभिमुख व्हावी तसेच संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार व्हावा याच उदात्त हेतून सावंतवाडी केन्द्रद्वारे आयोजन केले आहे.
बालबोध,प्रारम्भ,प्रवेश,परिचय,
कोविद अशा स्वरूपात अभ्यासक्रम असेल, परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
या उपक्रमाच्या माध्यमातून नक्कीच सर्वसामान्य व्यक्ति संस्कृत बोलू शकेल. त्याला संस्कृतभाषेचा परिचय होईल.
शालेय स्तरावर ,8 वी,9वी, 10वी करीता अनेक विद्यार्थी संस्कृत विषय घेतात अशा विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा नक्कीच लाभ होईल.
कोरोना प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत अशा स्थितीत सदर बालबोध वर्ग ऑनलाइन आयोजित केले आहे.
अनेक संस्कृत तज्ञ शिक्षकांचे या ऑनलाइन वर्गात मार्गदर्शन लाभणाऱ आहे. वर्ग वेळ रविवारी सकाळी 10.00ते .11.00 या वेळेत वर्ग घेतला जातो.
अशी माहिती सरळ संस्कृत केंद्र व्यवस्थापक तथा संचालक आचार्य हरिश्चंद्र गवस यांनी दिली.
तरि इच्छुकांनी नक्कीच
आचार्य कल्पेशजी यांच्याकडे संपर्क करावा. 80100 95744 अथवा
9405575680 संपर्क साधून नाव नोंदणी करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा