You are currently viewing नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाच्या नारायण सुर्वे कवी कट्टा तर्फे राज्यस्तरीय बहुभाषिक कवी संमेलन उत्साहात व भरघोस प्रतिसादात संपन्न 

नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाच्या नारायण सुर्वे कवी कट्टा तर्फे राज्यस्तरीय बहुभाषिक कवी संमेलन उत्साहात व भरघोस प्रतिसादात संपन्न 

दि. 23 जूलै रोजी सायं. ५ ते ८.३० वाजेपर्यंत गुगल मीटवर कवी संमेलन घेण्यात आले. राज्यभरातूनच नव्हे तर राज्याबाहेरुनही ७३ नावे काव्य संमेलनासाठी आली होती परंतु वेळेच्या अभावी फक्त ५०कवी कवयित्री यांची फायनल यादी तयार करून ५२कवींनी सहभाग नोंदवून साडेतीन तास कवितेचा सततधार पाऊस पडत होता अन सर्व सहभागी आनंदाने आस्वाद घेत होते…


याप्रसंगी मा. प्रमुख पाहूण्या साहित्यिक प्रा. सुमती पवार मॅडम अन संमेलनाध्यक्षा साहित्यिक डॉ.सौ. शकुंतला चव्हाण ताईसाहेबांनी साडेतीनतास वेळ देत आपले मनोगतातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
तर कवयित्री निकिता पवार यांनी ओघवत्या शैलीत सुंदर असे सुत्रसंचलन केले…तर आभार प्रदर्शन रविकांत शार्दूल यांनी केले. संमेलन आटोपल्यानंतर पूजा बागूल यांनी ग्राफिक्स बनवून सर्व सहभागींना सुबक सन्मानपत्र वितरित करण्यात आली.
अविनाश पाटील सर धुळे
यांनी समर्थपणे तांत्रिक बाजू हाताळली. त्यामुळे कुठेही खंड न पडता ऑनलाईन संमेलन पार पडले…
संमेलनाचे आयोजक सौ. सुनिता पाटील नाशिक यांनी विशेष परिश्रम घेऊन संमेलन यशस्वी पार पडले.

नागेश अहिरे :- बाबांच्या चेह-यावरच दुःख,
सौ स्मिता कुलकर्णी :- माझे बाबा,
श्री सीताराम गवळी – बाबा तुलाच शोधतो,
कु. खुशबू मगर :- शिक्षक,
सौ. माया सांळुके :- धरणी माय तपनी (अहिराणी),
सौ सविता काळे :- गुरुमाऊली
सौ. माधुरी खेडेकर:- ज्ञानाचा सागर
डॉ. उषाश्री बागडे :- सच्चा गुरु (हिंदी) ,
शुंभागी पाटिल :- घे भरारी आकाशी,
सुशिला पिंपरीकर :- माणूस रूप
श्री नाना महाजन :- नदी,
श्री. मकरंद जाधव :- टिचर टिचर (इंग्रजी),
अकबर म्हमदुले:- मेरी आँखों में देख,
भाग्यश्री बागड:- आई माझी गुरु,
बालकवी पियूष गांगुर्डे:- विठ्ठल,
दिपक आहिरे :- गुरुवंदना,
संतोष तळेगावे,:- वारी
सुरेश पवार :- दान करावे जगावेगळे,
संगिता बोरसे:- गुरू
कविता बिरारी :- अभंग, विठ्ठल
नानाभाऊ माळी:- माँ (हिंदी),
सिमाराणी बागूल :- गुरू
सौ. विदया पाटिल:- वारी आषाढी शिक्षणाची,
सौ गजश्री सोनवणे:- शाळा माझी भरणार आहे,
एन. आर पाटील :- गुरुदक्षिणा,
प्रा. मगन सूर्यवंशी : श्रावण येतोय,
केवलानंद टलवारे :- मराठी सदगुरु,
सौ स्मिता धर्माधिकारी :- गुरू
भारती देव नाशिक :- हाक
प्रकाश पाटिल – मुलांनो अपसेट होऊ नका,
दिपाली पाटील :- तेथे कर माझे जुळती :
श्री सुरेश नाना पाटील – बाप रिटायर होतोय,
विवेक पाटिल :-
संदेश बावीस्कर :-
माधुरी पाटिल :-
श्री रविकांत शार्दुल- लावणी,
आदी कवी कवयित्रींनी मराठी, हिंदी, अहिराणी, इंग्लिश भाषेत एकापेक्षा एक सकस सरस कविता सादर केल्या!

प्रतिक्रिया व्यक्त करा