कितीवेळा तुमका सांगलय,,
निवडणुकी मनार घेनत नाय.
बोटा जरी तुमची असली तरी,,
भरवसो तेंच्यार ठेवत नाय.
भावनिक साद घालून कधी,,
माणसा आपली होनत नाय.
आयुष्यात घडान गेलेले गोष्टी,,
मनातसून कधी जानत नाय.
वरवर होय म्हणणारे लोक,,
मनापासून पाठिंबो देनंत नाय.
नोटींसाठी लाळ घोटणारे,,
कधीच आपले बनत नाय.
स्वतःवर नाय विश्वास तुमचो,,
लोकांवर आंधळो ठेवनत नाय.
अति आत्मविश्वासानं जिंकण्याचा,,
उसना अवसान आणनत नाय.
जय आणि पराजय दोनय,,
श्रीमंताकय चुकनत नाय.
फुशारकी मारून लोकांपुढे,,
त्वान्ड लपवून पळनत नाय…
(दिपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६