You are currently viewing वाढत्या महागाईच्या विरोधात कुडाळ येथे काँग्रेसची रॅली

वाढत्या महागाईच्या विरोधात कुडाळ येथे काँग्रेसची रॅली

कुडाळ

वाढत्या महागाईच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस रविवारी २५ जुलैला कुडाळ शहरात बैलगाडी व सायकल रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध करणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी १० वाजता कुडाळ येथे उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे.
कोविड नियमांचे पालन करून सकाळी कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून रॅलीला प्रारंभ होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा