जे घडून गेलं घडायचं, आभाळ डोक्यावरच पडायचं
कोकणच्या सुपुत्रा, आता रडायचं नाही लढायचं
जे घडून गेलं घडायचं…………
निसर्गाचा कोप झालाय, जरी झालीय हानी
सहानुभूतीवर जगू नको, तू आहेस मानी
वाहून गेलं सर्व काही, पुन्हा उभं करायचं
जे घडून गेलं घडायचं…………
बघू आता सरकारही, किती लवकर देते मदत
आशेवर राहून तू, बसणार नाही रडत
मार्ग काढत पुन्हा एकदा, संकटाला नडायचं
जे घडून गेलं घडायचं…………
माणुसकी जागी होईल, येईल मदतीचा पूर
मित्रत्वाच्या भावनेनं, भरून येईल उर
आशेचे पंख लावून, मित्रा आता उडायचं
जे घडून गेलं घडायचं…………
चंद्रहास गोपिनाथ रहाटे
कोकणचा सुपुत्र