देवगड
देवगड महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचे निधन झाले. 1973 साली त्यानीं देवगड येथे महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून गोपाळराव मयेकर यांनी आठ वर्षे काम पाहिले यानंतर ते बांदा मापसा येथील महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम पाहत होते. यानंतर त्यांनी खासदार म्हणून निवडणूक लढवली व ते यशस्वी झाले. काल त्यांचे निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय 87 वर्षे होते देवगडशी त्यांचे ऋणानुबंध असल्याने देवगड मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

