शिरोमणी काव्य
मुखवटा
सहज वावर
नसती गुपितं अंतरी
मुक्त भेद भावनांस आवर
मुखवटा
मोकळा हसरा
हास्य लकेर फुलोरा
निर्भेळ आनंद करी पसारा
मुखवटा
सत्य वचनी
दावी वाट सन्मार्गी
खरे बोल नित्य वदनी
मुखवटा
नजरेची चोरी
कुणी पाहत नाही
हे स्वतःच्या मनास विचारी
मुखवटा
वरवर रंगलेला
सर्व ज्ञात जगासी
रंगा आड आतून भंगलेला
(दिपी)✒️
©दीपक पटेकर
८४४६७४३१९६