बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी घरातूनच निर्माण केले विठ्ठलमय वातावरण

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी घरातूनच निर्माण केले विठ्ठलमय वातावरण

बांदा

महाराष्ट्राची आराध्य अस्मिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाची पंढरपूर येथे आषाढी एकादशी दिवशी दरवर्षी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राबररोबर देशाच्या विविध कानाकोपर्‍यातून वारकरी दिंडीने पंढरपुरात पोहचतात या दिवशी संपूर्ण भक्तिमय वातावरणात असते. शाळांमधून वारकरी दिंडी काढूनआषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरीही या दिवशीचा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून आॉनलाईन स्वरूपात विविध सहशालेय उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ शाळेने या दिवशी विद्यार्थ्यांसाठी घरातूनच आॉनलाईन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करून विठ्ठलमय वातावरण तयार केले.
या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून श्री विठ्ठल, रुक्मिणी ,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई ,संत जनाबाई ,संत गाडगेबाबा यासह विविध संतांच्या व देवदेवतांच्या वेशभुषा साकारून आपल्या भाषणातून पर्यावरण संवर्धन ,झाडे लावा झाडे जगवा,कोरोना जनजागृती, व्यसनमुक्ती इत्यादी सामाजिक विषयावर संदेशही आपल्या भाषणातून दिले. या दिवशी अभंग ,गौळण ,गजर याच्या गायनातून भक्तिमय वातावरणात तयार केले. तसेच लाडक्या विठूरायाकडेआमची शाळा लवकर उघडू दे, आम्हालाही आमच्या शाळेत मित्र मैत्रीणीसोबत शाळेत गप्पा गोष्टी मौजमजा खेळ खेळायला मिळू दे अशी विनवणी केले.
हा आॉनलाईन स्पर्धात्मक उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बांदा केंद्रशाळेतील सर्व शिक्षक व पालकांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा