You are currently viewing भरपावसात भुईबावडा घाटाची आ. नितेश राणे यांच्याकडून पाहणी

भरपावसात भुईबावडा घाटाची आ. नितेश राणे यांच्याकडून पाहणी

सा. बां च्या नियोजनशून्य कारभारबाबत व्यक्त केली नाराजी

वैभववाडी
भुईबावडा घाट मार्गात दरड कोसळण्याचे सत्र सुरू आहे. यामार्गे सद्यस्थितीत एकेरी वाहतूक सुरू आहे. अतिवृष्टीमुळे या मार्गावरील ठिकाणी साईड पट्ट्या खचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी भुईबावडा घाट मार्गाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनशून्य कारभाराबाबत नितेश राणे यांनी पाहणी दौर्‍यात नाराजी व्यक्त केली.

सलग तीन दिवस घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. संबंधित विभागाने दरड बाजूला करून या मार्गातून एकेरी वाहतूक सुरू केली. दरड कोसळलेल्या ठिकाणी आ. राणे यांनी पाहणी केली. कोसळलेल्या सर्व दरडी विभागाकडून दरीत ढकलल्या जात आहेत. या कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी अधिकाऱ्यांनी घाट रस्ता दुरुस्तीला निधीच नसल्याचे सांगितले. आ. नितेश राणे यांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधत घाट मार्गाकडे विशेष लक्ष देण्याबाबत सुचना केली. तसेच भुईबावडा बाजारपेठ नजीक खचलेल्या रस्त्याची देखील त्यांनी पाहणी केली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, उपसभापती अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, तानाजी मोरे, आकोबा पाटील, संताजी रावराणे, सुनील भोगले, आशिष रावराणे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, शाखा अभियंता टी.व्ही. कांबळे, श्री. एस.एस. दुडये व संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 10 =