You are currently viewing सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे

१ कोटी ६८ लाख रक्कमेचे फर्नीचर खरेदीस राज्य शासनाची मंजूरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १ कोटी ६८ लाख ४० हजार २५० इतक्या रक्कमेचे फर्नीचर खरेदी करण्यासाठी राज्यशासनाकडून प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले असून यासाठी ९६६ कोटी रु.निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान हे महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु व्हावे यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासकीय रुग्णालयाची इमारत ताब्यात घेण्यात आली आहे.

हे महाविद्यालय सुरु होण्यासाठी आवश्यक असलेले फर्नीचर खरेदीसाठी १ कोटी ६८ लाख ४० हजार २५० रु. निधीस प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यानुसार आता लवकरच फर्निचर खरेदी केली जाणार आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा