You are currently viewing बांदा शिवसेनेकडून आमदार केसरकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

बांदा शिवसेनेकडून आमदार केसरकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

बांदा
आमदार दीपक केसरकर हे विकासपुरुष आहेत. त्यांनी बांदा शहराला २ कोटी रुपयांहून अधिक विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे. कधीही कामाचे श्रेय न घेणारे आमदार केसरकर हे जनतेच्या मनातील आमदार असल्याचे कौतुकोदगार शिवसेना बांदा शहरप्रमुख साई काणेकर यांनी काढले.
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील वैद्यकीय, आरोग्य, आशा सेविका, पत्रकार यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ जगदीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य रिया आलमेडा, स्वप्नाली पवार, राजेश विरनोडकर, पांडुरंग नाटेकर, भाऊ वाळके, डिंगणे शाखा प्रमुख निलेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी, पत्रकार, आशा सेविका, बांदा रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, झाडांचे रोप व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना साई काणेकर म्हणाले की, दीपक केसरकर यांचे बांदा शहरावर नेहमीच प्रेम राहिले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात आरोसबाग पूल, सासोली ते वेंगुर्ले ही पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी व शहरातील पायाभूत विकासकामे मार्गी लावली आहेत.
यावेळी संजना सावंत या आशा सेविकेला सायकल भेट देण्यात आली.
यावेळी ओंकार नाडकर्णी, बाबा सावळ, ज्ञानेश्वर येडवे, संदेश पावसकर, नागेश बांदेकर, विषु पावसकर, साई करमळकर, विठ्ठल वाळके, गौरव नाटेकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकार्ये उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा