You are currently viewing आठवलेंकडून आंबेडकरी जनतेशी गद्दारी..

आठवलेंकडून आंबेडकरी जनतेशी गद्दारी..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केंद्रीयमंत्री रामदास आठवले मंत्री झाले. परंतु आता त्यांनी आपल्याच नावाने पक्ष काढून आंबेडकरी जनतेशी त्यांनी गद्दारी करून घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे पक्ष काढणाऱ्या आठवलेच्या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यात आंबेडकरी चळवळ उभी करणार अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रातनभाऊ कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए-आंबेडकर चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आंबेडकराचं नाव घेत जातीयवादी भाजपा व आरएसएस यांच्याशी हातमिळवणी करून केंद्रात मंत्रिपद पदरात पाडून घेतले. आंबेडकराचं नाव पक्षाला असल्याने सर्व आंबेडकरी जनतेने त्यांना पाठींबा दिला. परंतु आपले मंत्रिपद कायम रहावे यासाठी त्यांनी भाजपासारखेच होत त्यांनी आपल्याच नावे पक्ष काढला. म्हणजे पूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए-आंबेडकर होते. ते आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -आठवले केले. त्यामुळे आपल्याच नावे पक्ष काढून आता त्याच आंबेडकरी विचाराशी व जनतेशी गद्दारी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा