You are currently viewing प्रतिष्ठित व्यापारी मधुकर नाईक यांचे दुःखद निधन

प्रतिष्ठित व्यापारी मधुकर नाईक यांचे दुःखद निधन

न्हावेली (ता.सावंतवाडी)

येथील प्रतिष्ठित व्यापारी मधुकर तुकाराम नाईक यांचे शुक्रवारी (ता.१६) सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ५८ वर्षे वयाचे होते.मधू दुकानदार या नावाने ते परिचित होते.
लहान वयात अतिशय कष्ट करून त्यांनी आपला व्यवसाय उभारला होता. बांबू व्यापारी म्हणूनही त्यांची सिंधुदुर्ग,कर्नाटक, गोवा येथे ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली, एक मुलगा,सून नातू,नात असा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा