You are currently viewing व्यापाऱ्यांना दर 15  दिवसांनी ‘आरटीपीसीआर’ बंधनकारक

व्यापाऱ्यांना दर 15 दिवसांनी ‘आरटीपीसीआर’ बंधनकारक

मालवण :

 

मालवण शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रतीबंधनात्मक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे व त्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून मालवण शहरातील सर्व व्यापारी व्यावसायिक, भाजी, मच्छी विक्रेते, स्टॉलधारक ,दुकानदार, यांनी दर पंधरा दिवसांनी आरटीपीसीआर तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

 

आरटीपीसीआर तपासणी नगरपरिषदने नियुक्त केलेले पथक बाजार पेठेत बॉम्बे टेक्स्टाईल दुकान जवळ व नगर परिषद कार्यालयाच्या अल्पबचत हॉल नगर परिषद येथील covid-19 लॅब येथे तपासणी केंद्र मध्ये सकाळी 10 ते 12  व दुपारी 3 ते 5 या वेळेत होणार आहे. सर्व व्यवसायिक, व्यापारी, भाजी विक्रेते, स्टॉलधारक, संकुलातील दुकानदारांनी, आरटीसीआर तपासणी करून घ्यावी. तसेच covid-19 प्रतिबंध करण्याकरिता सामाजिक अंतर माक्सचा वापर व खबरदारीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा