सावंतवाडी
सावंतवाडी खासकिलवाडा येथील मोती तलावालगत असलेल्या सावंतवाडी तहसीलदार यांच्या शासकीय बंगल्याची संरक्षक भिंत कोसळली आहे. गेले पाच ते सहा दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे या भिंतीचे दगडी बांधकाम ढासळले आहे. त्या भिंतीला लागूनच रहदारीचा रस्ता असल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.