You are currently viewing साळगांव येथे पुलावर आलेल्या पाण्यातून मोटारसायकल घेऊन जाण्याची मस्ती आली अंगलट

साळगांव येथे पुलावर आलेल्या पाण्यातून मोटारसायकल घेऊन जाण्याची मस्ती आली अंगलट

सुदैवाने ग्रामस्थांनी त्या दोन युवकांना वाचविण्यात मिळविले यश

कुडाळ

पुलावर पाणी असताना दुचाकी पाण्यात घालणारे दोघे युवक ग्रामस्थांच्या जागृतपणामुळे सुदैवानेच वाचले. गुरूवारी सकाळी ११.३० वाजता माणगाव रस्त्यावर साळगाव कोरगावकरवाडी येथील पुलावर ही घटना घडली. गेले चार दिवस संततधार कोसळणार्‍या पावसामुळे सर्वत्र पुराचे पाणी भरले आहे.

तसेच साळगाव पुलावरही पाणी आले पुलावर आलेल्या पाण्यातून गुरुवारी सकाळी दोघा युवकांनी दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला पुलाच्या मध्यभागी दुचाकी घेऊन हे युवक पोहचले आणि पाण्याच्या प्रवाहात दुचाकी घसरली व पलटी झाली व दोघे युवक पडले. पुलावरील पाण्याच्या प्रवाहाचा त्याना अंदाज आला नसल्याने गाडीसह दोघे वाहत गेले मात्र तेथे असलेल्या ग्रामस्थांनी वेळीच मदतकार्य केल्यामुळे अनर्थ टळला.

सुदैवानेच ते वाचले हा प्रकार मात्र अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेर्‍यात कैद केला आहे. घटने नंतर त्या दोघा युवकांनी तेथून पळ काढला, त्यामुळे त्यांची नावे कळू शकली नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − ten =