दुर्ग मावळा प्रतिष्ठानमध्ये आजपर्यंत अनेकजण मोठ्या संख्येने विविध कार्यामार्फत सहभागी झाले आहेत. दुर्ग मावळा ची स्थापना ही छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यच्या संकल्पनेतून कोणत्याही जाती धर्माच्या वादात अडकत न बसता फक्त शिवकार्यासाठी साकार झालेली एक संघटना आहे. आज बऱ्याच संस्था अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे पण दुर्ग मावळा ही संस्था गेल्या दोन वर्षापासून सामाजिक कार्य, दुर्ग भ्रमंती, इतिहास अभ्यास मोहिम, गडकिल्ले संवर्धन मोहिमा सातत्याने राबवत आहे.
रविवार दिनांक ११ जुलै २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनोहर मनसंतोष गडावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमाअंतर्गत पूर्ण दिवस गडावर हा उपक्रम राबविण्यात आला. या गडावर गेल्यावर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत १० कदंबाची झाडे लावण्यात आली होती. यापैकी यावर्षीपर्यंत ९ झाडे जगली. झाडे मोठी होईपर्यंत प्रत्येक महिन्याला तिथे जाऊन त्याची काळजी घेण्यासाठी दुर्ग मावळा परिवाराची टीम तिथे जात आहे.
या वर्षी बेहड्याची चार, वड तीन, पिंपळ, चिंच, आवळा, कडूनिंब व इतर प्रत्येकी एक अशी झाडे लावण्यात आली.
दुर्ग मावळा प्रतिष्ठान च्या २४ मावळ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. यामध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक उपशिक्षणाधिकारी आंगणे साहेब, कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, कोकण विभाग सरचिटणीस सुनिल करडे, कोकण विभाग महिला अध्यक्ष वेदिका मांडकुलकर, कोकण विभाग कार्याध्यक्ष समील नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पंकज गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख महेश अडसुळे, ॲड विवेक मांडकुलकर, मनोहर मनसंतोष गड संवर्धन टीम प्रमुख रोहन राऊळ व प्रणय राऊळ, समीर धोंड, राणी मांडकुलकर, सर्वेश नाईक, सिद्धांत कुडाळकर, तन्वी गावडे, यशवंत गावकर, अनिकेत सावंत, रजत बागडी, अक्षय सावंत, दत्ता जेठे, विकी सावंत, राजू कोंडुरकर, निल पवार, समीर आरोंदकर इ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान चे मावळे उपस्थित होते.
सदर वृक्षारोपण मोहिमेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्ष समता वारंग यांनी झाडे दिली तसेच सुनिल करडे यांनी अल्पोपहाराची सोय केली होती.