You are currently viewing उद्योग क्रेडिट गॅरटी उद्योजक संवाद

उद्योग क्रेडिट गॅरटी उद्योजक संवाद

*उद्योग क्रेडिट गॅरटी उद्योजक संवाद.*

कुडाळ

मध्यम सूक्ष्म लघु मंत्रालयामार्फत *मा.नारायण राणे* कॅबिनेट मंत्री भारत सरकार यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकाना उद्योग वाढीसाठी उद्योग मंत्रालया मार्फत *सुक्ष्म आणि लघु उद्योग क्रेडिट गॅरंटी फंड (CGTMSE)* मार्फत एक कोटी वरिल उलाढालीतील व्यवसाय उत्पादक यांचा साठी *शुक्रवार दि.१३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह* येथे कुडाळ एमआयडीसी उद्योग संघटना, सिंधुदूर्ग व्यापारी संघ, पर्यटन महासंघ यांचा सहभागाने उद्योग संवाद आयोजित केला आहे. या कार्यकमात योजनेची माहिती व फायदा व क्रेडिट गॅरंटी फंडचे उद्योजकांचे कर्ज पुरवठा प्रकरण करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला मध्यम लघु सुक्ष्म मंत्रालयांचे *मा.धिरज कुमार (ऐजिएम.) मा. के. शहाजी, मा. रिशब जैन,संगिता पुजारी* तसेच राष्ट्रीयकृत बॅकेचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी तसेच खाजगी बॅकेचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांनी या संधिचा फायदा घ्यावा अशी विनंती उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष *विजय केनवडेकर* यांनी केले आहे. अधिक माहिती साठी ९४२०२०६८७३ नंबर वर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा