भाजपा राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत यांचे आव्हान
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ईडीची नोटीस म्हणजे धोक्याची घंटा
कणकवली
ईडी ची नोटीस म्हणजे काय व चौकशी म्हणजे काय ते सतीश सावंत यांनी प्रथम स्पष्ट करावे. जिल्हा बँकेच्या ठेवींचे पैसे परत देण्यास जबाबदार आहे असे सावंत सांगतात. परंतु कर्ज दिलेल्या कारखान्यापैकी एखादा कारखाना जरी नुकसानीत आला तरी पुर्ण जिल्हा बँक धोक्यात येईल. पैसे परत करण्याची हमी देणाऱ्या सतीश सावंत यांनी संचयनी बँकेचे अध्यक्ष असतांना घरोघरी जाऊन गोरगरीबांचे पैसे जमवले होते ते पैसे प्रथम परत करा. नंतर सिंधुदुर्ग बँकेतील पैशाची जबाबदारी घ्या असे आव्हान भाजपा राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत यांनी प्रसिद्धी पत्रातून दिले आहे.
मुळात जरंडेश्वर साखर कारखाना सातारा जिल्हयात येतो त्या कारखान्याचा आणि सिंधुदुर्ग जनतेचा कोणताही संबंध येत नाही . त्या कारखान्याला कर्ज देण्याचे कारण काय ? हे दिलेले कर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आज ज्यावेळी ईडीची नोटीस आली त्याचवेळी समजले . तोपर्यंत जनतेला बँकेमधून कोणाकोणाला कर्ज वाटप केले त्याचा थांगपत्ता नव्हता आणि अजून किती जिल्हयाबाहेरील साखर कारखान्याना तसेच सुत गिरणींना कर्ज दिले आहे याची सुद्धा ईडीमार्फत रितसर चौकशी झाली पाहिजे मागणी सुरेश सावंत यांनी केली.
माझ्यामते एकूण दिलेल्या कर्जाच्या ४० पेक्षा जास्त कर्ज ही जिल्हयाबाहेरील काखान्याना व सुत गिरणींना दिलेली आहे . मात्र सिंधुदुर्गातील जनता ज्यावेळी कर्ज मागायला जाते त्यावेळी अनेक कागदपत्र आणण्यासाठी तगादा लावला जातो व कर्ज नाकारले जाते.मात्र या साखर कारखान्यांना व सुत गिरणींना कर्ज देतेवेळी कोणती हमी घेतली व किती कोटीचे कर्ज दिले याची चौकशी झाली पाहीजे अशी मागणी सुरेश सावंत यांनी केली.