सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यामध्ये तौक्ते वादळाने केलेल्या नुकसानीची भरपाई जिल्ह्यासाठी ४५ कोटी ४९ लाख ३३ हजार एवढी रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम प्रत्येक तालुक्याला वाटप करण्यात आली आहे मात्र अजून नुकसानग्रस्तांच्या खाती ही रक्कम अदा करण्यात आलेली नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १६ व १७ मे रोजी टोपे वादळ घोंगावले होते. या वादामुळे समुद्रकिनाऱ्यावरील मच्छीमार यांसह सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेल्या ग्रामीण भागातही मोठे नुकसान केले होते. या नुकसान या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून विविध राजकीय संघटनांनी मागणी केली होती.
तसेच महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा होता. दरम्यान शासनाकडून या नुकसानग्रस्तांसाठी ४५ कोटी ४९ लाख ३३ हजार रुपये एवढे एवढा निधी सिंधुदुर्गामध्ये पाठवण्यात आला आहे. यामध्ये तालुकानिहाय निधी तहसीलदार यांच्या खाती जमा करण्यात आला आहे.
मात्र अद्याप हा निधी नुकसानग्रस्तांच्या खाती जमा झालेला नाही ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही अशी माहिती शासकीय सूत्रांकडून मिळाली असून नुकसानग्रस्त तालुक्यातमध्ये सर्वाधिक मालवण तालुक्याला ११ कोटी ८८ लाख ८९ हजार, एवढा निधी देण्यात आलेला आहे. तसेच दोडामार्ग तालुक्याला ९५ लाख ९५ हजार, सावंतवाडी तालुक्यासाठी ५ कोटी ३४ लाख ५५ हजार ७०० रुपये, वेंगुर्ला तालुक्यासाठी ८ कोटी ९ लाख ३०० रुपये, कुडाळ तालुक्यासाठी ७ कोटी २ लाख ८५ हजार २००, कणकवली तालुक्यासाठी २ कोटी ३५ लाख ४५ हजार, देवगड तालुक्यासाठी ६ कोटी ५२ लाख ६६ हजार ८००, वैभववाडी तालुक्यासाठी ३ कोटी २९ लाख ९६ हजार रुपये एवढा नुकसानग्रस्त निधी पाठवण्यात आला आहे लवकरच हा निधी खातेदारांच्या नावे जमा केला जाणार असल्याचे ही माहिती शासकीय सूत्रांकडून मिळत आहे.