काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांना होणाऱ्या वित्तपुरवठा प्रकरणी (टेरर फंडिंग) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग, श्रीनगरसह इतर अनेक भागात छापेमारी केली. आतापर्यंत ५ लोकांना अटक केली असून अटक केली आहे. ३६ वर्षीय महिलेचाही यात समावेश आहे.
एनआयए ने रविवारी दारुल उलूम, दलाल मोहल्ला, नवा बाजार येथे छापे टाकले आहेत. त्यासोबतच अदनान अहमद नदवीला अटक केली आहे. एनआयए सह जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ चे जवान यांच्या पथकाने ही कारवाई केली.
त्या महिलेकडून चिनी बनावटीचे ग्रेनेड आणि ४८ हजार रोख रक्कम जप्त केली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने यापूर्वी ही दहशतवादी संघटनांना मदत केल्यामुळे ११ पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.