महाराष्ट्र राज्य तर्फे विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स आणि सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत शासनाने नेमके कोणते निकष ठेवले आहेत यासंदर्भात तसेच ग्रामीण भागातील मुले आहेत ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध होऊ शकत नाही त्या त्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात तसेच वाढीव फी संदर्भात आज मनसेच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी सौ कल्पना बोडके यांची पंचायत समिती सावंतवाडी येथे भेट घेऊन चर्चा केली यावेळी गटशिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व फी संदर्भात सर्व शाळांचे आपण चर्चा करू व आवश्यक त्या ठिकाणी सरप्राईज विजिट देऊ असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले यावेळी मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर शहराध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.