सर सर ती, सर गं आली,
पावसात मी, चिंब गं झाली !!धृ!!
झाडे वेली त्या, न्हाऊनी गेल्या
भिजूनी घरी, चिमण्या आल्या
घरट्यात ती, ऊब मिळाली !!१!!
चहूकडे ते, पाणी साठले
नदी नाले ते, वाहू लागले
कडकड ती, वीज पळाली !!२!!
पाने फुले ती, मोती माळती
चिखलात ती, गुरे लोळती
शहारून ती, वासरे गेली !!३!!
मुलेच सारी, हट्ट करीती
आईस पुन्हा, ती विनवती
पाणी उडता, झाली ती ओली !!४!!
कागदाची ती, नाव सोडूनी
वाहती नाव, हसे पाहूनी
डुबता नाव, निराशा केली !!५!!
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६