सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 45 वर्षेावरील वयोगटातील नागरिकांचे कोवीशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र सोमवार दि. 12 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 5 हजार 760 लसी उपल्बध असणार आहेत. यावेळी कोणत्याही परिस्थितीत 45 वर्षा खालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित संस्थांना पाठविण्यात आलेली असून त्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. तरी 45 वर्षावरील नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सदर लसीकरण सत्रादरम्यान उपलब्ध लसींची माहिती पुढीलप्रमाणे आहे. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र निहाय पुढीलप्रमाणे लस उपलब्ध आहेत. वैभववाडी तालुक्यात वैभववाडी- 120, उंब्रड -120, कणकवली तालुक्यात खारेपाटण – 120, कासार्डे-120, कनेडी-120, फोंडा -120, कळसुली-120, वरवडे-120, नांदगाव-120, एसडीएस कणकवली-120, देवगड तालुक्यात पडेल-120, मोंड-120, फणसगाव-120,मिठबांव-120, ईळये-120, शिरगाव-120, आरएच देवगड-120
मालवण तालुक्यात आचरा – 120, मसुरे-120, चौके-120, गोळवण-120, हिवाळे-120, आरएच पेंडूर कट्टा-120, आरएच मालवण-120, कुडाळ तालुक्यात कडावल-120, कसाल-120, पणदूर-120, हिर्लोक-120, माणगाव-120, वालावल-120, आरएच कुडाळ-120, डीएच सिंधुदुर्ग-120, वेंगुर्ला तालुक्यात परुळे-120, आडेली-120, तुळस-120, रेडी-120, आरएच वेंगुर्ला-120, एसडीएच शिरोडा-120, सावंतवाडी तालुक्यात मळेवाड-120, सांगेली-120, निरवडे-120, आंबोली-120, बांदा-120, एसडीएच सावंतवाडी-120, दोडामार्ग तालुक्यात भेडसी-210, मोरगाव-120, तळकट-120, आरएच दोडामार्ग-120 अशा एकूण 5 हजार 760 लसी उपलब्ध असणार आहेत.