You are currently viewing अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

पापणी लवताची वाटे,
काहीतरी अघटित घटे.
अंधश्रद्धेचे भय तिथे,
मानवाच्या मनी दाटे.

रोगराई पसरता चहूकडे,
पापपुण्याचा हिशोब होई.
गरजे एवढेच पचन होतं,
अतिरिक्त ते वाया जाई.

देवधर्म मनी भक्तिभाव,
श्रद्धेने प्रार्थना हा उपाय.
बळी देता ना वाचे जीव,
विज्ञान हा एकच पर्याय.

बाबा महाराज गंडे दोरे,
बघती आपले बंद डोळे.
हेरती सावज नवे कोरे,
हतबल माणूस देव भोळे.

मांजर आडवं गेलं म्हणून,
कधी रस्ता बंद होत नाही.
प्रयत्नांती काम होत असे,
आळशीच हे कारण पाही.

चमत्कार क्वचित होतात,
घडवून कोणी आणत नाही.
अंधश्रद्धेपोटी फुकट काही,
देण्याची कुणा दानत नाही.

(दिपी)
दीपक पटेकर, सावंतवाडी.
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + fourteen =