You are currently viewing मनाई आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे संचलन

मनाई आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे संचलन

दोडामार्ग

जिल्ह्यात नुकत्याच जाहीर केलेल्या मनाई आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर दोडामार्ग बाजारपेठेत येथील पोलिसांनी संचलन केले. दंगा काबू पथकातर्फे हे संचलन झाल्याचे पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी काल संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केलेले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने अनेक अटी, शर्ती व नियम घालण्यात आले आहेत. त्यानुसार आज सकाळी दोडामार्ग बाजारपेठेत पोलिसांकडून संचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दंगा काबू पथकाचे संचलन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा