सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात सरासरी 41.27 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1291.41 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 44(1350), सावंतवाडी – 27(1511.10), वेंगुर्ला – 38.20(1038.20), कुडाळ – 55(1172), मालवण – 65(1437), कणकवली – 26(1347), देवगड – 46(1175), वैभववाडी – 29(1301), असा पाऊस झाला आहे.