कणकवली :
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने आत्मा अंतर्गत शेतकरी सल्ला समिति निर्माण केली. या समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ व विविध योजना प्रशिक्षण अभ्यास दौरे केले जातात. नव्याने गठीत झालेल्या समितीतील सर्व सदस्यांनी संघटित काम करून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करावी. आत्मा शेतकरी सल्ला समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे उपक्रम राबवित शेतकऱ्यांना सक्षम बनवावे, असे आवाहन कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी केले.
कणकवली तालुका कृषी कार्यालय येथे कृषी व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकरी सल्ला समितीची पहिली संपन्न झाली. या सभेमध्ये नूतन अध्यक्षपदी सर्वानुमते कोंडये या गावातील प्रगतशील शेतकरी वसंत राजाराम तेंडुलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी वसंत तेंडुलकर यांचे नाव रवींद्र जठार यांनी सुचविले व अनुमोदन गणेश तांबे यांनी दिले. नूतन अध्यक्ष वसंत तेंडुलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.
समितीचे कार्य आणि उद्देश काय आहेत, पुढील काळात शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कशा पद्धतीने काम करायचे आहे. पंचायत समितीचा कार्यकाल दोन वर्षाचा असून चालू आर्थिक वर्षात 13 लाख 36 हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आत्मा सदस्य सचिव विनायक पाटील यांनी दिली.
तालुकास्तरीय आत्मा अंतर्गत शेतकरी सल्ला समितीमध्ये विद्यमान जि. प. अध्यक्ष संजना सावंत, पं.स. सभापती मनोज रावराणे ,संजय आग्रे ,श्रेया सावंत, स्वरूपा विखाळे, भाग्यलक्ष्मी डीचवलकर, रवींद्र जठार सायली सावंत, धनंजय देसाई, मिलिंद खोत ,वसंत तेंडुलकर, विजय कुडतरकर ,अनिल पेडणेकर, निर्मितीकुमार राणे, रसिका सावंत, ज्योती देसाई, आनंद साळसकर ,गणेश तांबे ,संजय सावंत, गणपत परब, नीलम सावंत ,अशोक कांबळे ,सुभाष मालवणकर, आनंद घाडीगावकर, प्रकाश नागव अशा 25 सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे.
पहिल्या सभेत मागील वर्षाचा आढावा नूतन अध्यक्ष वसंत तेंडुलकर व सदस्यांनी घेतला. या सभेत मनोज रावराणे, स्वरूपा विखाळे, गणेश तांबे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी एस. एस. हजारे, कृषी अधिकारी तोरणे व आत्माचे व्ही. एम .पाटील व अन्य सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.