You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश…

दोडामार्ग तालुक्यातील युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश…

दोडामार्ग

तालुक्यातील युवकांनी आज विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.दरम्यान दोडामार्ग तालुका विद्यार्थी कॉग्रेस अध्यक्षपदी नीळकंठ देसाई यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी सावंतवाडी तालुका विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस इंद्रनील अनगोळकर, सावंतवाडी शहर सरचिटणीस दीपक पिरणकर उपस्थित होते. तर प्रवेश गुरुदास दळवी, चेतन पास्ते, ओमकार देसाई, रामचंद्र देसाई, बाळा देसाई आदी असंख्य युवकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =