You are currently viewing भोसले पॉलिटेक्निकचे विद्यार्थी चमकले

भोसले पॉलिटेक्निकचे विद्यार्थी चमकले

बजाज ऑटोसाठी 16 विद्यार्थ्यांची यशस्वी निवड

सावंतवाडी

दुचाकी व तीनचाकी वाहन निर्मितीत अग्रेसर असणाऱ्या बजाज ऑटोतर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या 16 विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात झाली. कंपनीच्या पुणे व औरंगाबाद येथील प्रकल्पांवर या विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे.
कॉलेजच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातून निवड झालेल्या या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे – रुचिका परब, अविनाश गावडे, तेजस डोईफोडे, साईराज टोपले, तुषार भाईडकर, भिवा राऊळ, गौरव गावडे, प्रणित तळवणेकर, आदिनाथ सावंत, सोनू लाड, मंथन किनळेकर, साहिल गावडे, आदेश सावंत, अनिकेत गवस, बापू गवस, प्रथमेश वारंग.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कॉलेजचे ट्रेनिंग-प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.मिलिंद देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य गजानन भोसले यांनी कॅम्पसमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 20 =