You are currently viewing पावसाळी अधिवेशनात चहापान कार्यक्रमाला अनुपस्थित राहून मुख्यमंत्र्यांनी परंपरा मोडली – नारायण राणे

पावसाळी अधिवेशनात चहापान कार्यक्रमाला अनुपस्थित राहून मुख्यमंत्र्यांनी परंपरा मोडली – नारायण राणे

ठाकरे सरकार जनतेचे नसून स्वतःची कामे करून घेण्यासाठी…

सिंधुदुर्गनगरी

पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेतले जात असून पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुपस्थित राहून परंपरा मोडली.त्यामुळे हे ठाकरे सरकार राज्यातील जनतेच्या भल्यासाठी नसून स्वतःची कामे करून घेण्यासाठी आहे.अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.दरम्यान एकीकडे स्वतःला वाघ म्हणायचे आणि दूसरीकडे कोल्ह्याप्रमाणे पळून जायचे, असाच हा प्रकार असल्याचाही टोला त्यांनी यावेळी लगावला.येथील पडवेमधील मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री.राणे बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद गटनेते रणजीत देसाई उपस्थित होते. पुढे बोलताना खा राणेंनी राज्यातील आघाडी सरकारने ५ व ६ रोजी पावसाळी अधिवेशन बोलाविले आहे. कोरोनाचे कारण सांगत दोन दिवस अधिवेशन जाहिर केले आहे. याचवेळी केंद्र सरकारचे १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन होत आहे. केंद्र सरकार एवढे दिवस अधिवेधन घेत आहे तर महाराष्ट्र सरकार का नाही ? असा प्रश्न करीत ‘याचा अर्थ हे सरकार पळकुटे आहे’, असा आरोप केला. एकदाही मंत्रालयात पाऊल न ठेवता राज्याचा कारभार चालविणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला आहे. अधिवेशन पूर्वसंध्येला चहापान व पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहणारा मुख्यमंत्री सुद्धा पहिलाच पाहिला आहे, असेही राणेंनी यावेळी सांगितले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + eight =