सावंतवाडी :
ओटवणे गावातील दूरध्वनी केंद्र गेल्या एक महिन्यापासून बंद आहे सदर इमारत जमीनदोस्त झाल्या मुळे गेला एक महिना पंचक्रोशीतील दूरध्वनी बंद अवस्थेत आहेत त्याचा जाब विचारण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने बीएसएनएल ला धडक देण्यात आली त्यावेळी जिल्हा प्रबंधक श्री मांझी यांच्यासह अधिकारी श्री भिसे श्री आशिष कुमार उपस्थित होते त्यांनी 31 ऑक्टोंबर पूर्वी सदर मोबाईल टॉवरच्या ठिकाणी नवीन दूरध्वनी केंद्राची इमारत बांधून ठिकाणी दूरध्वनी केंद्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा प्रबंधक श्री मांझी यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. तसं न झाल्यास मनसेच्या वतीने दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी बीएसएनएल कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली व त्याची सर्व जबाबदारी बीएसएनएलच्या जिल्हा प्रबंधक यांची राहील असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले यावेळी मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष ऍड अनिल केसरकर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर सावंतवाडी शहराध्यक्ष अशिष सुभेदार शहर उपाध्यक्ष देवेंद्र कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.